उन्हाळ्यात केस निरोगी ठेवण्यासाठी करा हे उपाय!
उन्हाळा लवकरच येणार आहे. केसांची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.
उष्ण हवामानात केस कोरडे आणि निर्जीव होण्याचा धोका असतो.
आतापासून तुमच्या रुटीनमध्ये काही गोष्टींचा समावेश करून तुम्ही तुमचे केस खराब होण्यापासून वाचवू शकता.
कोरफडीचा गर अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. हे केस आणि टाळूवर लावल्याने केसांना पोषण मिळते.
तुमच्या केसांना कोरडेपणापासून वाचवण्यासाठी आठवड्यातून किमान दोनदा केसांना तेल लावा. कारण ते केसांना नैसर्गिक चमक देते.
उन्हाळ्यात केस दर दुसऱ्या दिवशी धुवावेत आणि केस धुतल्यानंतर कंडिशनर नक्की वापरावा.
हीटिंग टूल्स वापरल्याने तुमचे केस कोरडे, निर्जीव बनतात आणि तुटायला लागतात. त्यांच्या वापरामुळे केसांची चमक पूर्णपणे हरवते.
घरच्या घरी हेअर मास्क बनवून केसांना लावल्याने ते हायड्रेटेड राहतात आणि त्यांना पोषक सुद्धा मिळते.
आपले केस निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी आपल्या डेली रुटीनमध्ये या गोष्टी लक्षात ठेवा.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक