कॉफी अरेबिका नावाच्या झाडाच्या फळापासून कॉफी तयार केली जाते, या झाडावर उगवणाऱ्या कॉफीबीन भाजून आणि बारी करून कॉफी पावडर बनवली जाते.
कॉफीचे सेवन मर्यादित प्रमाणात केल्यास शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.
ऊर्जा आणि चपळता वाढवण्यासाठी कॉफी उपयुक्त आहे. कॉफीमध्ये असलेले कॅफिन मेंदू आणि मज्जासंस्थेची क्रियाशीलता वाढवते.
एका संशोधनानुसार, दररोज ४ कप कॉफी कॉफी प्यायल्याने, टाइप २ मधुमेहाचा धोका ३० टक्क्यांनी कमी होतो.
कॉफीमध्ये असलेले कॅफिन मेटाबॉलिजम वाढवते म्हणजेच अन्नातून ऊर्जा निर्माण करण्याची प्रक्रिया यासोबतच त्यातून निर्माण होणारी उष्णता लठ्ठपणावर नियंत्रण ठेवते.
एका संशोधनानुसार मर्यादित प्रमाणात कॉफीचे सेवन केल्याने यकृत सुरक्षित राहते.
कॉफीच्या सेवनाने अल्फा- अमायलेज नावाचा एन्झाइम वाढते, यामुळे नैराश्य, तणाव आणि चिंता यापासून आराम मिळतो.
कॉफी अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश यांसारख्या न्यूरोडीजेनरेटिव्ह रोगांपासून देखील संरक्षण करते.