अंडे नेमकं किती वेळ उकडावे?

अंडी खाणे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असते. यामध्ये कित्येक पोषणतत्त्वांचा समावेश आहे.

कित्येकदा अंडे उडकताना ते फुटते किंवा सोलताना त्याचा पांढरा भागही बाहेर येतो.

अंडे योग्य पद्धतीने न उकडल्यास या समस्यांचा सामना करावा लागतो.

चार ते सहा मिनिटे अंडे उकडल्यास आतील पांढरा भाग पूर्णपणे शिजतो. पण बलक मऊच राहते.

अंडे सात-नऊ मिनिटे उकडल्यास बलकही शिजते. उकडलेले अंडे तुम्ही सॅलेडसोबतही खाऊ शकता.

10-12 मिनिटे अंडे उकडल्यास ते पूर्णपणे शिजते. कढी, सँडविच, दुपारच्या जेवणातही तुम्ही अंड्याचा समावेश करू शकता.

12 मिनिटांहून अधिक वेळ अंडे उकडू नये. कारण बलक चवीला चांगले लागत नाही. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)