भात सडसडीत हवा? ‘या’ 5 सोप्या टिप्स फॉलो करा
आपल्या जेवणात भाताशिवाय जेवण अपुरं वाटतं. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात भात असला की पोटही भरल्यासारखं वाटतं आणि जेवणाला पूर्णता मिळते.
पण अनेकदा भात चिकट होतो. भात चिकट झाल्यावर त्याची चव फिकी होते आणि पुलाव, बिर्यानीसारख्या पदार्थांची मजा निघून जाते.
हे पाणी जास्त घातल्यामुळे होतं असं लोक मानतात पण प्रत्येकवेळी हेच कारण असतं असं नाही.
गृहिणींसाठी अशा काही ट्रिक्स आहेत, ज्याचा वापर करुन भात चिकट होणार नाही.
लिंबू भात शिजवताना त्यात काही थेंब लिंबाचा रस टाका. लिंबातील आम्लिकतेमुळे भात चिकटत नाही आणि दाणेदार राहतो.
ब्रेड स्लाइस कधी भातात जास्त पाणी पडलं तर त्यावर एक स्लाइस ब्रेड ठेवा. ब्रेड अतिरिक्त पाणी शोषून घेतो आणि भात सैलसर होतो.
पाण्याचं योग्य प्रमाण भात शिजवताना पाण्याचं मोजमाप खूप महत्त्वाचं असतं. भाताच्या मापाच्या तुलनेत नेहमी थोडं कमी पाणी घालावं.
तूप किंवा लोणी भात शिजवताना प्रेशर कुकरमध्ये थोडं तूप किंवा लोणी वरून टाकल्यास भाताला चवदारपणा येतो आणि दाणे एकमेकांना चिकटत नाहीत.
मंद आचेवर शिजवा भात उच्च आचेवर शिजवल्यास तो लवकर मऊ होतो आणि चिकटतो. मंद आचेवर शिजवल्यास पाणी हळूहळू आटतं आणि भात सुंदर फुलतो.