खरे की खोटे, दागिने नेमके कसे ओळखावे?
खरे कुंदन दागिने मौल्यवान स्टोनपासून बनवलेले असतात आणि ते जड असतात. बनावट दागिने हलके असतात.
खऱ्या कुंदन दागिन्यांवर बॅक इनॅमल वर्क किंवा क्लिअर फिनिशिंग असते. बनावट दागिन्यांवर हे काम
नसते.
कुंदन दागिन्यांवर चुंबकांचा परिणाम होत नाही. जर चुंबकाने ते आकर्षित केले तर ते दागिने बनावट
असतात.
अस्सल कुंदन दागिन्यांचा दगडाला स्पर्श होताच थंड वाटतात, ते नैसर्गिक रत्ने किंवा उच्च दर्जाचे काच असतात.
खऱ्या कुंदनाची चमक वेगळी आणि खोल असते, तर बनावट कुंदनाची चमक तेजस्वी आणि हलकी असते.
अस्सल कुंदन दागिने सोन्यापासून बनवलेले असतात आणि त्यावर ओथेंटिसिटी मार्क (हॉलमार्क) असतो.
दागिने सर्टिफाइड ज्वेलर्सना दाखवा. ते खरे आणि नकली यात सहज फरक करू शकतात.