पावसाळ्यात झटपट सुकवायची आहे जीन्स? ट्राय करा ‘हे’ हॅक्स

अनेकदा आपण हवामानाचा अंदाज न घेता जीन्स घालून घराबाहेर पडतो आणि पाऊस पडतो. अशावेळेस पावसाळ्यात भिजलेली जीन्स सुकवणे हे एक मोठं आव्हान ठरत, पण काही सोपे हॅक्स वापरून तुम्ही ती झटपट सुकवू शकता.

कधीकधी जीन्स जास्त वेळ उन्हात वाळत घातल्याने त्याचा रंग फिका पडतो. अशा परिस्थितीत जीन्स नेहमी सावलीच्या ठिकाणी उलटी वाळत घालावी.

जीन्स लांबीच्या दिशेने वाळत घालावी जीन्स दुमडल्याने हवेचा प्रवाह वाढतो. जीन्स वाळत घातलेली असताना तिला सतत काही वेळाने पलटत राहावे.

कमी वेळात जीन्स सुकवण्यासाठी, तुम्ही ती टॉवेलमध्ये गुंडाळून त्यातील अतिरिक्त पाणी काढू शकता, अशा प्रकारे पावसाळ्यात ती पटकन सुकू शकते.

जीन्स सुकवण्यासाठी कधीकधी तुम्ही तुमचा हेअर ड्रायर वापरू शकता. हेअर ड्रायर कमी तापमानावर सेट करा आणि जीन्स सुकवा.

तुम्ही जीन्स सुकवण्यासाठी हिटरजवळ ठेवू शकता, त्याचे गरम तापमान पावसाळ्यात कमी वेळात जीन्स सुकवण्यात फायदेशीर ठरू शकते.

जीन्स फार जास्त भिजली नसेल आणि दमट असेल तर अशा वेळेस इस्त्रीच्या मदतीने तुम्ही ती सुकवू शकता.