बाहेरून चांगला पण आतून खराब असणारे आंबे ओळखण्याच्या ट्रिक्स

उन्हाळा हा आंब्यांचा सिझन असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्यांची आवक होत असते.

काहीवेळा बाहेरून चांगले दिसणारे आंबे आतून मात्र खराब निघतात.

अशावेळी खरेदी करताना आतून खराब असलेला आंबा कसा ओळखायचा याविषयी काही ट्रिक्स जाणून घेऊयात.

हापूस आंबा खरेदी करताना त्याचा आकार नीट पाहावा. आंब्याचा आकार हा थोडा उभट असेल तर असे आंबे आतूनही चांगले असतात.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा

त्याच उलट जर आंब्याचा आकार हा साधारण गोलाकार असेल तर असा आंबा बाहेरून चांगला दिसत असला तरी आतून खराब निघण्याची शक्यता असते.

तसेच जर हापूस आंब्याच्या देठाकडील भागात खोल खड्डा असेल तर असा आंबा आतून खराब निघण्याची शक्यता असते.

त्याउलट आतून चांगल्या आंब्याच्या देठाकडचा भाग हा किंचित खोलगट पण सरळ दिसेल असा असतो.

तेव्हा आंबा निवडताना त्याच्या देठाकडचा भाग किती खोलगट आहे हे नक्की तपासा.

आंबा खरेदी करताना त्यावर कोणताही डाग नाही ना हे देखील तपासलं पाहिजे. 

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा