‘या’ भाज्यांमध्ये हळद टाकायची नसते, गृहिणींनो तुम्हाला माहितीय का?
भारतीय स्वयंपाकघरात हळदीचा वापर जवळपास प्रत्येक भाजीमध्ये केला जातो.
हळदीमुळे केवळ रंग आणि चवच वाढत नाही तर तिचे औषधी गुणधर्मही शरीरासाठी फायदेशीर ठरतात
मात्र हिरव्या पालेभाज्यांमध्ये हळद घालण्याची पद्धत नाही.
पालक ही लोह आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध पालेभाजी आहे, पण तिच्या भाजीमध्ये हळद वापरली जात नाही.
त्याचप्रमाणे मेथीची भाजी आरोग्यासाठी उत्तम मानली जाते, पण तिच्या नैसर्गिक कडवट चवीवर हळदीचा परिणाम होतो.
हळदीमुळे पालेभाजीचा नैसर्गिक हिरवा रंग खराब होतो आणि ती पिवळसर दिसू लागते.
शिवाय, हळदीचा ठसठशीत स्वाद पालेभाजीच्या मूळ चवीला बदलतो.
म्हणूनच पालक, मेथी, चाकवत, शेपू यांसारख्या पालेभाज्यांमध्ये हळद टाकली जात नाही
तरीसुद्धा, काहीजण आवडीनुसार किंवा सवयीने पालेभाजीत थोडी हळद घालतात.
पुढच्या वेळी तुम्ही पालेभाजी कराल तेव्हा हळद न टाकता करून बघा आणि तिची खरी नैसर्गिक चव अनुभवून पहा.