सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी चहा प्यावा की नाही, काय होतो परिणाम?

सकाळी उठल्या उठल्या गरम चहाचा कप पिणे ही अनेक भारतीयांची आवडती सवय आहे. पण, आरोग्य तज्ञांच्या मते, रिकाम्या पोटी चहा पिणे आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते. ही सवय तुमच्या शरीरासाठी एक प्रकारे विष बनू शकते आणि अनेक गंभीर समस्या निर्माण करू शकते.

ॲसिडिटी वाढवते  उपाशी पोटी चहा प्यायल्याने पोटातील ॲसिड तयार होण्याचे प्रमाण वाढते. यामुळे छातीत जळजळ, पोटदुखी आणि ॲसिडिटी सारख्या समस्या होतात.

पचनशक्तीवर परिणाम  चहामध्ये टॅनिन नावाचे तत्व असते, जे पचनशक्तीवर नकारात्मक परिणाम करते. यामुळे जेवण नीट पचत नाही आणि पोट फुगणे किंवा अपचन सारख्या समस्या उद्भवतात.

शरीराच्या पोषणावर परिणाम सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास, शरीराला जेवणातील पोषक तत्वे शोषून घेणे कठीण होते. विशेषतः, चहामुळे शरीरात लोह योग्य प्रकारे शोषले जात नाही, ज्यामुळे रक्ताच्या कमतरतेची समस्या होऊ शकते.

मळमळ आणि डोकेदुखी  चहामधील जास्त प्रमाणात असलेले टॅनिन आणि कॅफिन रिकाम्या पोटात गेल्याने मळमळ आणि उलट्या होण्याची भावना निर्माण होते. काही लोकांना यामुळे डोकेदुखीचाही त्रास होतो.

अल्सरचा धोका  जर तुम्ही नियमितपणे रिकाम्या पोटी चहा प्यायला, तर पोटाच्या आतल्या अस्तराला नुकसान होऊ शकते. यामुळे पोटाच्या अल्सरचा धोका वाढतो.

रक्तातील साखरेची पातळी  सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही परिस्थिती खूप धोकादायक ठरू शकते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)