रोज नॉनव्हेज खाल्ल्याने आरोग्यला खरंच होत नुकसान, आठवड्यातून किती वेळा खावं?

नॉनव्हेज हे प्रथिने आणि इतर पोषक तत्वांचा एक उत्तम स्रोत आहे, ज्यामुळे ते जगभरात लोकप्रिय आहे. पण, अनेक लोकांना हा प्रश्न पडतो की, रोज नॉनव्हेज  खाणे आरोग्यासाठी सुरक्षित आहे का? आरोग्य तज्ञांच्या मते, रोज नॉनव्हेज खाण्याचे काही फायदे असले तरी, त्याचे काही दुष्परिणामही होऊ शकतात. त्यामुळे, किती प्रमाणात खावे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

प्रथिने आणि स्नायूंची वाढ नॉनव्हेजमध्ये उच्च दर्जाची प्रथिने असतात, जी स्नायूंच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे, जे लोक नियमित व्यायाम करतात, त्यांच्यासाठी ते फायदेशीर ठरते.

रोज खाण्याचे दुष्परिणाम  जर तुम्ही रोज जास्त प्रमाणात नॉनव्हेज खात असाल, विशेषतः तळलेले किंवा जास्त तेलात बनवलेले, तर शरीरातील चरबी आणि कोलेस्ट्रॉल वाढू शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका संभवतो.

अँटिबायोटिक्सचा धोका  आजकाल बाजारात मिळणाऱ्या चिकनमध्ये वाढ जलद करण्यासाठी अँटिबायोटिक्स आणि हार्मोन्सचा वापर केला जातो. रोज अशा प्रकारचे नॉनव्हेज खाल्ल्यास शरीरावर याचे दुष्परिणाम होऊ शकतात.

बनवण्याची पद्धत महत्त्वाची  नॉनव्हेज कसे बनवले जाते, हे खूप महत्त्वाचे आहे. तळलेल्या नॉनव्हेजपेक्षा भाजलेले, उकडलेले किंवा वाफवून खाणे अधिक आरोग्यदायी असते.

आठवड्यातून किती वेळा खावे? आरोग्य तज्ञांच्या मते, नॉनव्हेज आठवड्यातून 2 ते 3 वेळा खाणे पुरेसे आहे. हे तुमच्या शरीराला आवश्यक प्रथिने देईल आणि कोणत्याही संभाव्य धोक्यापासून वाचवेल.

संतुलित आहार नॉनव्हेजला तुमच्या संतुलित आहाराचा भाग बनवा. फक्त नॉनव्हेजवर अवलंबून न राहता, तुमच्या आहारात पालेभाज्या, फळे, आणि इतर प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)