अनेकदा आपण खूप काम केलं किंवा उन्हात बाहेर गेलो की घाम येतो. पण घाम येणं चांगलं की वाईट? शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी घाम येणे आवश्यक आहे.
व्यायाम करताना किंवा उष्णतेमध्ये घाम येणे हे शरीराचे सामान्य आणि नैसर्गिक कार्य आहे.
जास्त घाम आल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास जास्त घाम येणे धोकादायक ठरू शकते.
अचानक, खूप जास्त आणि अकारण घाम येणे हे वैद्यकीय समस्येचे लक्षण असू शकते.
थायरॉईड, मधुमेह किंवा तणाव यांसारख्या समस्यांमुळे जास्त घाम येऊ शकतो.
जास्त घाम येण्यामुळे त्वचा विकार किंवा सामाजिक अस्वस्थता होऊ शकते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)