घरात काचेच्या वस्तू कोणत्या दिशेला ठेवाव्यात, जाणून घ्या

वास्तूशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक वस्तू ठेवण्याचे नियम सांगण्यात आले आहेत. या घरगुती वस्तूंपैकी एक म्हणजे काचेच्या वस्तू.

अनेकदा लोक काचेच्या वस्तू घरात कुठेही ठेवतात, जे योग्य नाही. काचेच्या वस्तू घरात कशा आणि कुठे ठेवाव्यात जाणून घेऊयात.

वास्तूनुसार घराच्या पूर्व आणि उत्तर दिशेला काचेच्या वस्तू ठेवाव्यात. घरामध्ये काचेच्या वस्तू ठेवण्यासाठी पूर्व आणि उत्तर दिशा शुभ मानली जाते. 

घराच्या पूर्व दिशेला काचेच्या सजावटीच्या वस्तू ठेवल्याने घरात शांती आणि समृद्धी राहते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते.

उत्तर दिशा धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते, या दिशेला काचेच्या वस्तू ठेवल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते.

त्याच बरोबर जर तुम्ही घर सजवण्यासाठी काचेच्या जड वस्तू वापरत असाल तर घराच्या नैऋत्य दिशेला ठेवणे शुभ मानले जाते.

घरामध्ये दक्षिण दिशेला काचेच्या वस्तू ठेवू नयेत.

काचेच्या वस्तू दक्षिण दिशेला ठेवणे अशुभ मानले जाते. 

वास्तुनुसार शनिवार सोडून आठवड्याच्या इतर कोणत्याही दिवशी काचेच्या वस्तू किंवा भांडी खरेदी करावे.