पिंक टॅक्स? हा कोणता कर जो केवळ महिलांनाच भरावा लागतो

आपण नेहमीच आयकर, कॉर्पोरेट कर आणि जीएसटीबद्दल ऐकत असतो. पण बहुतांश लोकांना पिंक टॅक्सबद्दल माहिती नसते.

हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कर नाही, जो सरकारकडून आकारला जातो.महिलांना आपल्या पर्सनल केअर वस्तू आणि सेवांसाठी या कराचे जादा पैसे मोजावे लागतात.

बहुतेकांना याबद्दल माहिती नसली तरी या अदृश्य कराच्या माध्यमातून तुमचा खिसा खाली होत राहतो. 

याचा सर्वाधिक फटका थेट महिलांना बसतो. त्यामुळे पिंक टॅक्स म्हणजे काय ते जाणून घेऊया.

पिंक टॅक्स खरं तर कोणताही अधिकृत टॅक्स म्हणजे कर नाही. हा लिंग-आधारित किंमतीतील भेदभावाचा एक प्रकार आहे.

हा कर स्त्रियांना त्यांच्या वस्तू आणि सेवांसाठी आकारला जातो. सरासरी, महिलांना उत्पादनांवर 7 टक्के जास्त पैसे आकारले जातात.

दुसरीकडे, आपण पर्सनल केअरच्या वस्तू सेवांवर 13 टक्क्यांपर्यंत कर आकारण्यात येतो.

जेव्हा एखादे उत्पादन महिलांसाठी डिझाइन केलेले असते.जसे की परफ्यूम, पेन, बॅग आणि कपडे इत्यादी. यांवर कंपनी महिलांकडून जास्त शुल्क घेतात.

हा कर स्त्रियांना त्यांच्या वस्तू आणि सेवांसाठी आकारला जातो. सरासरी, महिलांना उत्पादनांवर 7 टक्के जास्त पैसे आकारले जातात.