महिलांसाठी मकरसंक्रांती निमित्त खास उखाणे
गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी,…..रावांचे नाव घेते संक्रांतीत हळदी कुंकुवाच्या वेळी.
मोत्याची माळ सोन्याचा साज…. रावांचे नाव घेते संक्रात आहे आज.
जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण, ……रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुवाचे कारण.
मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकूवाचा घातल घाट ,आमच्या … रावांचा आहे एकदम राजेशाही थाट
निसर्ग निर्मितीच्या वेळी सूर्यनारायण झाले माळी, …..रावांचे नाव घेते संक्रांतीच्या वेळी.
देवीच्या मंदिराला सोन्याचा कळस, राव आहेत सर्वांपेक्षा सरस
गोकुळासारख्या सासरी सारे आहेत हौशी, …. रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी
तिळाचा स्नेह गुळाची गोडी, सदा सुखात राहो …. राव आणि माझी जोडी
हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात दिसतात ही 5 लक्षण
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा