कलिंगड की खरबूज.. डायबेटिज कंट्रोलसाठी काय जास्त फायदेशीर?
सध्या उन्हाचा तडाखा वाढत असून अनेकजण शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड किंवा खरबूज सारख्या फळांचा आहारात समावेश करतात.
कलिंगड आणि खरबूज या दोन्हींच्या सेवनाने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते.
परंतु डायबेटिज असलेल्यांनी दोघांपैकी कोणत्या फळाचे सेवन करावे याविषयी जाणून घेऊयात.
कलिंगड एक असे फळ आहे जे शरीराला हायड्रेट ठेवते आणि वजन कंट्रोल करते
खरबूज आणि कलिंगड दोन्ही फळातील ग्लायसेमिक इंडेक्स हाय असतो.
ग्लायसेमिक इंडेक्स हे एक मापक आहे ज्यावरून समजते की कार्बोहायड्रेट युक्त पदार्थांचे सेवन केल्याने रक्तातील शुगर लेव्हल किती वेगात वाढते.
कलिंगडमधील ग्लायसेमिक इंडेक्स हाय असतो, परंतु एकदा याचे सेवन केल्याने शरीरात कमी कार्बोहायड्रेट पोहोचते.
एक कप खरबूजाचे ग्लायसेमिक लोड 3.14 पेक्षा थोडे कमी असते. याच कारण असं की दोन्ही फळांमध्ये 90 टक्के पाणी असतं.
त्यामुळे खरबूज आणि कलिंगड ही दोन्ही फळ डायबेटिज कंट्रोल करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
खरबूज आणि कलिंगड हे दोन्ही डायबेटिजच्या रुग्णांसाठी चांगले असेल तरी याचे सेवन मर्यादित प्रमाणातच करावे.
खरबूजमध्ये पोटॅशियम मात्रा जास्त असते तर सोडियमचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत मिळते.
खरबूजात कॅलरी, फायबर, प्रोटीन, फॅट, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट्स आणि फोलेट हे पोषक घटक असतात. याशिवाय खरबूजात अँटी-ऑक्सिडंट आणि एडेनोसिनसारखे अनेक औषधी गुणधर्मही आढळतात.
कलिंगडामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, लोह आणि अँटी ऑक्सिडेंट्स सारखे अनेक पोषक घटक असतात. .
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)