बांधल्याने की खुले ठेवल्याने केस लांब कसे वाढतात?

केस हे सौंदर्याचं प्रतीक आहेत. लांब, दाट आणि काळेभोर केस मिळावेत अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते.

केस खुले ठेवल्यास नुकसान वाढतं, धूळ, प्रदूषण आणि उन्हाच्या थेट संपर्कामुळे केस कोरडे, तुटके आणि निस्तेज होतात.

खुले केस गुंततात, विंचरताना तुटण्याचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे केसांची वाढ मंदावते.

बांधलेले केस सुरक्षित राहतात. सैल वेणी, पोनीटेल किंवा आंबाडा घातल्याने केसांना प्रदूषणापासून संरक्षण मिळतं.

खूप घट्ट बांधल्यास टाळूवर ताण येतो. त्यामुळे मुळं कमजोर होतात आणि केस गळण्याची शक्यता वाढते.

घरी असताना सैल वेणी ठेवा यामुळे केसांना श्वास घेता येतो आणि तुटण्याचं प्रमाण कमी होतं.  झोपताना केस सैल बांधा मोकळे केस झोपेत गुंततात आणि तुटतात; सैल वेणी सर्वोत्तम पर्याय आहे.

बाहेर जाताना केस झाका स्कार्फ किंवा दुपट्ट्याने केस झाकल्यास ते उन्हापासून आणि धुळीपासून वाचतात.

केस वाढीसाठी आहार आणि मसाज महत्त्वाचे प्रोटीनयुक्त आहार, तेल मसाज आणि नैसर्गिक हेअर मास्क नियमित करा.

संतुलन ठेवा आणि नियमित काळजी घ्या. केस खुले ठेवायचे की बांधायचे, यापेक्षा त्यांना योग्य काळजी, पोषण आणि विश्रांती देणं जास्त गरजेचं आहे.