प्रेग्नन्सीमध्ये महिलांनी चुकूनही करू नयेत ‘या’ गोष्टी
गर्भधारणेचा काळ खूप नाजूक असतो, अशा वेळेस गर्भवती महिलांनी ताणतणाव टाळावा.
गर्भवती महिला कठोर परिश्रमामुळे लवकर थकतात जे त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी चांगले नसते.
गर्भवती महिलांनी दारू, धूम्रपान, ड्रग्स अशा कोणत्याही आम्ली पदार्थांचं सेवन करू नये.
चहा, कॉफी किंवा चॉकोलेट कितीही आवडत असेल तरी त्याचे सेवन कमी करा.
जास्त कॅफिनमुळे बाळाचे वजन कमी होण्याचा धोका वाढू शकतो.
गर्भवती महिलांनी जड वस्तू उचलणे खूप काम किंवा हेवी वर्कआउट यांसारख्या गोष्टी करणं टाळावे.
जास्त वेळ उभे राहणे टाळावे, यामुळे पायांना सूज येऊ शकते आणि पाठदुखी होऊ शकते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)