साधं, सिम्पल पण दिसायचं स्टायलिश? गिरीजा ओक सारखी तुम्हीही ट्राय करा ‘ही’ साडी

फॅशन ही दररोज बदलणारी गोष्ट आहे. रोज नवीन फॅशन ट्रेंड असतो आणि आजकाल प्रत्येकजण तो ट्रेंड फॉलो करतो.

पण फॅशनमध्येही न बदलणारी एकमेव गोष्ट म्हणजे साडी. वेगवेगळे रंग, पॅटर्न, डिझाइन्स या सगळ्यांमध्ये आपण रोजच्या वापरासाठी साडीचा वापर करू शकतो.

पण अनेकदा प्रश्न पडतो तो म्हणजे दररोज नवा लुक आणि स्टायलिश हलक्या फुलक्या साड्यांमध्ये कस दिसावं? जर तुम्हालाही हा प्रश्न पडत असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो याच उत्तर.

मराठी अभिनेत्री गिरीजा ओक हिने अलीकडेच तिचा साधा, सिम्पल साडी लुक शेअर केला आहे. जो दररोजच्या वापरासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय असू शकतो.

जांभळ्या रंगाची ही साधी साडी देखील नेसल्यावर अतिशय सुंदर दिसू शकते. कोणतेही हेवी दागिने नाही अतिशय साधी आणि सिम्पल साडी तुम्हीही रोज नेसू शकता.

जांभळा रंग हा असा रंग आहे जो सर्वांवर खुलून दिसतो. अशातच त्याला सफेद ब्लाउजवर परिधान करून तुम्ही त्याला आणखी सुंदर करू शकता.

या साडीवर तुम्ही मिनिमल दागिने वापरून त्याला मॉडर्न टच देऊ शकता जो तुम्ही ऑफिस किंवा कोणत्याही ओकेजनला घालू शकता.