थूंकी लावल्याने खरंच पिंपल्स जातात? काय सांगतात तज्ज्ञ
त्वचा हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहे, पण प्रदूषण, धूळ, घाम आणि तेलकटपणामुळे पिंपल्स, ऍक्ने आणि डाग निर्माण होतात.
ऑयली स्किन असणाऱ्यांना पिंपल्स जास्त प्रमाणात होतात, त्यामुळे ते वेगवेगळे उपाय करून पाहतात.
जुन्या काळात पिंपल्सवर सकाळची थुंकी लावण्याचा सल्ला दिला जात असे, कारण त्यावेळी क्रीम्स आणि मेडिसिन्स उपलब्ध नव्हते.
लाळेमध्ये अँटी मायक्रोबियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे सूज कमी होऊन जखमा भरून येण्यास मदत होते.
NCBI च्या संशोधनानुसार, थुंकीतील गुणधर्म पिंपल्स कमी करण्यास मदत करू शकतात, म्हणून जुने लोक हा उपाय करायचे.
मात्र, हा उपाय सर्वांसाठी योग्य नाही. ज्यांची ओरल हायजिन खराब आहे त्यांनी हा उपाय टाळावा, कारण हानिकारक बॅक्टेरिया पिंपल्स वाढवू शकतात.
PCOD असणाऱ्या महिलांनी हा उपाय करू नये, कारण त्यांच्या लाळेत जास्त हार्मोन्स असतात, जे पिंपल्स वाढवतात.
तोंडात इन्फेक्शन असणाऱ्यांनीही हा उपाय टाळावा, कारण त्यामुळे त्वचेवर जास्त नुकसान होऊ शकतं.
पिंपल्सपासून बचावासाठी, चेहरा स्वच्छ ठेवणे, हेल्दी डाएट घेणे, पुरेसे पाणी पिणे आणि तणाव कमी ठेवणे महत्त्वाचे आहे.
तरी त्वचारोगतज्ञांचा सल्ला घेणं हा सर्वोत्तम पर्याय आहे.