चहा-कॉफी नव्हे, ‘या’ पेयांनी करा दिवसाची सुरुवात; आजारपण राहील दूर!

दिवसाची सुरुवात करण्यासाठी गरम पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्यास पचनक्रिया सुरळीत चालते. या सवयीमुळं शरीरातील हानिकारक घटकांचं उत्सर्जन होण्यास मदत होते.

आल्यामध्ये असणाऱ्या गुणांमुळं पोट फुगणं, मळमळ या आणि अशा समस्या दूर ठेवण्यास मदत होते. सकाळी गरम पाण्यात आलं मिसळून पिण्याचे अनेक फायदे होतात.

पेपरमिंट किंवा पुदिन्यामध्ये असणाऱ्या गुणांनी स्नायूंना बळकटी मिळते. अपचनावर उपाय म्हणून गरम पाण्याच पुदिना मिसळून प्यावं.

पचनक्रिया सुधारण्यासाठी गरम पाण्यात अॅपल सायडर व्हिनेगर मिसळून प्यायल्यास अॅसिडीटी कमी होते.

पाण्यातून कोरफडीचा गर प्यायल्यास त्यामुळं आतड्यांमधील हानिकारक घटक शरीराबाहेर पडण्यास मदत होते.

हळदीमध्ये असणारे रोगप्रतिकारक गुणधर्म शरीरास फायदेशीर ठरतात. त्यामुळं हळद मिसळलेलं दूध पिणं फायदेशीर ठरतं.

पोटाचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी प्रोबायोटिक बॅक्टेरिया बरीच मदत करतात. त्यामुळं प्रोबायोटीक योगर्ट पिण्याचा सल्ला दिला जातो.

येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. News18 मराठी याचा दावा करत नाही.