डायटमध्ये अंडी नकोत? मग या 6 गोष्टींचं सेवन करा, प्रोटिन भरपूर मिळेल
शरीरात प्रोटिनची कमतरता जाणवायला लागली की अंड खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात, मात्र असे काही लोक आहेत ज्यांना अंड खायचं नाही मग त्यांनी काय करायचं?
अंड शरीरासाठी चांगलं असलं तरी बऱ्याच लोकांना ते खावं असं वाटत नाही किंवा खात नाहीत अशा शाकाहारी लोकांसाठी 6 सुपरफूड आहेत जे भरपूर प्रोटिन देतात
शाकाहारीमध्ये अंड्यापेक्षा जास्त प्रोटिन देणाऱ्या 6 गोष्टी आहेत, त्यांचा आहारात समावेश करायला हवा
फक्त प्रोटिनच नाही तर व्हिटामिन आणि फायबर देखील या गोष्टींमधून मिळतं, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली राहाते
सोयाबीन- 16.5 ग्रॅम प्रोटिन असतं, अंड्यात फक्त 6-7 ग्रॅम प्रोटिन असतं. शिवाय व्हिटामिन आणि फायबर देखील असतं जे हृदयासाठी चांगलं मानलं जातं
डाळ- अर्धा कप डाळीमध्ये 9 ग्रॅम प्रोटिन असतं, सूप, सॅलड किंवा वरणासारखं तुम्ही खाऊ शकता
राजमा- अर्धा कप र
ाजमामध्ये 7.5 ग्रॅम प्रोटिन असतं. फायबर, पोटाशियम, एंटिऑक्सिटंड म्हणून देखील काम करतं.
ब्लॅक बिन्स- यामध्ये 7.5 ग्रॅम प्रोटिन असतं. फायबर, एंटिऑक्सिटंड म्हणून देखील काम करतं.
पावटा/ वाल- यामध्
ये 7 ग्रॅम प्रोटिन असतं, फायबर, पोटॅशियम, फोलेट, मेलिब्डेनमचा चांगला सोर्स असतो जो पचनासाठी चांगला असतो
छोले- 7 ग्रॅम प्रोटिन असतं, याशिवाय मँगनीज, फोलेट, फायबर असतं जे डायजेशनसाठी चांगलं मानलं जातं