एवोकाडो हे एक अत्यंत आरोग्यदायी फळ मानले जाते. यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे, मोनोअनसॅचुरेटेड फॅट्स आणि फायबर असल्याने ते हृदयाच्या आरोग्यासाठी आणि एकूणच शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.
पण, अनेक आरोग्य तज्ञांच्या मते, एवोकाडो प्रत्येकासाठी योग्य नाही. काही विशिष्ट आरोग्य स्थिती असलेल्या लोकांनी एवोकाडो खाणे टाळावे, अन्यथा त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.
ज्यांना ॲलर्जी आहे काही लोकांना एवोकाडोची ॲलर्जी असू शकते. ‘लॅटेक्स फ्रूट सिंड्रोम’ नावाच्या स्थितीमध्ये, ज्या लोकांना नैसर्गिक रबरची ॲलर्जी आहे, त्यांना एवोकाडो खाल्ल्याने देखील ॲलर्जी होऊ शकते. यामुळे ओठांवर आणि तोंडात खाज येणे, सूज येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
पचनाच्या समस्या एवोकाडोमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. पोटाच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी जास्त फायबर घेणे त्रासदायक ठरू शकते. यामुळे गॅस, पोट फुगणे आणि डायरिया सारख्या समस्या उद्भवू शकतात.
यकृताचे आजार काही अभ्यासानुसार, एवोकाडोमध्ये असे घटक असू शकतात, जे यकृताच्या आरोग्यावर परिणाम करतात. जर तुम्ही यकृताच्या उपचारासाठी काही औषधे घेत असाल, तर एवोकाडो खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे एवोकाडोमध्ये निरोगी फॅट्स असले तरी, त्यात कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे, तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर जास्त प्रमाणात एवोकाडो खाल्ल्यास तुमच्या प्रयत्नांवर पाणी फिरू शकते.
गरोदर महिला काही तज्ञांच्या मते, गरोदरपणात एवोकाडो जास्त प्रमाणात खाऊ नये. यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात आणि काही प्रकरणांमध्ये स्तनपानावरही परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)