आतड्याच्या लायनिंग थेट मेंदूशी जोडलेल्या असतात हे अनेक अभ्यासात सिद्ध झालं आहे. यामुळंच चांगलं खाल्ल्यानंतर मूड चांगला होतो. 

अशाच काही चांगल्या पदार्थांची यादी देत आहोत, जे तुम्ही खराब मूडमध्ये असताना खाऊन पाहू शकता.

फॅटी फिश-सॅल्मन फिश, अल्बाकोर, ट्रॉट किंवा ट्यूना फिश हे फॅटी फिश आहेत. या माशांमध्ये भरपूर ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतं.

ओमेगा 3 फॅटी ऍसिड मेंदूच्या पेशींच्या पडद्यामध्ये द्रव तयार करतात, ज्यामुळे मेंदूच्या पेशी निरोगी राहण्यास मदत होते. म्हणून, मूड खराब असेल तर फॅटी मासे खा.

डार्क चॉकलेटमध्ये मूड बूस्टिंग कंपाउड असतात. याशिवाय यात कॅफीन, थिओब्रोमाइन आणि एन-एसिलेथिलामाइन हे कंपाउंड असतात जे मूड चांगला करतात

केळ्यामध्ये व्हिटॅमिन बी 6 असतं. जे डोपामाइन आणि सेरोटोनिन वाढवण्यास मदत करतं. हे दोन्ही हार्मोन चांगले न्यूरोट्रांसमीटर आहेत.

जरी ओट्स हा प्रथिनांचा खजिना मानला जात असला तरी त्यामध्ये चांगले कंपाउंड देखील असतात. ओट्समध्ये पुरेशा प्रमाणात फायबर असतं.

अभ्यासात असं आढळून आलं आहे की 1.5 ग्रॅम ते 6 ग्रॅम फायबर मूड आणि ऊर्जा पातळी सुधरवतं.

बदाम किंवा अक्रोड यांसारख्या सुक्या मेव्यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स भरपूर प्रमाणात असतात, जे मेंदूतील तरलता राखतात.

यासोबतच ते मेंदूच्या पेशींमध्ये जळजळ होऊ देत नाही. अभ्यासानुसार, ओमेगा 3 फॅटी अॅसिड डिप्रेशन दूर करण्यासाठी खूप मदत करतात.