‘ही’ सोपी योगासने तुम्हाला ठेवतील नेहमी तरुण!

तरुण दिसणं कोणाला आवडत नाही? प्रत्येकजण यासाठी प्रयत्न करत असतो.

पण तुम्हाला माहिती आहे का काही योगासने करून तुम्ही वयापेक्षा ५ वर्ष तरुण दिसू शकता.

सूर्यनमस्कार पूर्ण शरीरासाठीचा व्यायाम आहे. हे रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेला चमकदार बनवते.

शवासन ताणतणाव कमी करून शरीराला आराम देते. यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते, ज्यामुळे त्वचा ताजीतवानी दिसते.

वज्रासनामुळे पचनक्रिया सुधारते, हे शरीरातील टॉक्सिन्स काढून त्वचेला चमक देते.

प्राणायाम कपालभाती, अनुलोम-विलोम यांसारखे प्राणायाम त्वचेच्या ताजेतवानीसाठी उपयोगी आहे.

त्रिकोणासन पोटाचे स्नायू टोन करतो, शरीराला लवचिक बनवतो आणि तजेलपणा देतो.

वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून News18 मराठी कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय अवलंबण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घ्या.