‘हे’ सुगंधी पान करते अनेक रोग बरे, जाणून घ्या त्याचे फायदे
अन्नामध्ये तमालपत्राचा (तेज पत्ता) वापर सामान्य आहे. खाण्याव्यतिरिक्त तमालपत्राचा अनेक गोष्टींसाठी वापर केला जातो.
अन्नात सुगंध वाढवण्यासोबतच तमालपत्र आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानलं जात.
तमालपत्रात अँटीबॅक्टरील गुणधर्म आढळतात जे पाचन तंत्रात बॅक्टरीयाची वाढ रोखतात.
तमालपत्रात दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात जे शरीराला सूज कमी करण्यास मदत करतात.
तमालपत्रामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात जे शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास, पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात.
तमालपत्र रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते असे अनेक संशोधनातून समोर आले आहे.
तमालपत्र खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि पचनसंथा नीट काम करते असे अनेक लोक मानतात.
पॉलिफेनॉल नावाचे एक संयुग तमालपत्रात आढळते जे लिपिड प्रोफाइल निरोगी ठेवण्यास मदत करते आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारते.
तमालपत्राचा सुगंध मनाला शांत ठेवण्यास मदत करतो.