वजन कमी करायचंय? रात्रीच्या या सवयी ठरतील गेमचेंजर

आजच्या धावपळीच्या जीवनात वजन वाढीची समस्या सर्वत्र दिसते. अनेक महिला रोजच इंटरनेटवर “कसं वजन कमी करायचं?” याचे नवे उपाय शोधत असतात. पण वजन कमी करणं म्हणजे फक्त डाएट किंवा जिम नाही  ती एक लाइफस्टाइल आहे.

रात्रीच्या जेवणानंतरचे काही छोटे बदल तुमच्या वेट लॉस जर्नीला खूप सोपं बनवू शकतात.

चला तर पाहूया, अशा कोणत्या 3 सवयी तुम्हाला वजन कमी करण्यात मदत करतील

1. जेवणानंतर थोडं चालणं ठेवा जेवण झालं की लगेच झोपायची सवय असेल, तर ती बदलणं गरजेचं आहे. यामुळे शरीराचं मेटाबॉलिज्म सुधारतं, रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि चरबी साठण्याची शक्यता कमी होते.

2. हर्बल टी किंवा ग्रीन टी घ्या जेवणानंतर उबदार हर्बल टी जसं की ग्रीन टी, लिंबूपाणी, आलं-तुळशीचं पाणी घेतल्याने पचन सुधारतं. ग्रीन टीमधील अँटीऑक्सिडंट्स शरीरातली चरबी वितळवतात आणि झोपेत असतानाही थोडीफार कॅलरी बर्न होते.

3. 8 तासांची झोप ‘मस्ट’ रात्रीची झोप ही वजन कमी करण्यासाठी डाएटइतकीच महत्त्वाची आहे.

झोप पूर्ण न झाल्यास शरीरातलं ‘घ्रेलिन’ हार्मोन भूक वाढवतं आणि ‘लेप्टिन’ नीट कार्य करत नाही. परिणामी तुम्हाला सारखी भूक लागते, आणि मग सुरु होतात लेट नाईट स्नॅक्स

संशोधनानुसार, 5 तास झोपणाऱ्यांचं वजन 7–8 तास झोपणाऱ्यांपेक्षा जास्त वाढतं.

वजन कमी करणं म्हणजे मोठं युद्ध नाही. फक्त रोजच्या काही सवयींमध्ये थोडा बदल करा. फक्त 15 दिवसांतच तुम्हाला शरीरात सकारात्मक बदल जाणवेल.