प्रायव्हेट पार्टवरचे केस काढताना कशी घ्यावी काळजी?

आजकाल लोक वैयक्तिक स्वच्छतेबद्दल खूप जागरूक झाले आहेत. ते त्यांच्या शरीराच्या स्वच्छतेबाबत खबरदारी घेतात आणि यासाठी अनेक प्रकारच्या उत्पादनांचा वापर देखील करतात.

आपल्या आरोग्यासाठी प्रायव्हेट पार्टची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. येथील केस शरीराला संसर्ग आणि जंतूंपासून वाचवतात, परंतु जर केस जास्त झाले किंवा घाण साचली तर खाज सुटणे आणि संसर्ग देखील होऊ शकतो.

म्हणून, वेळोवेळी इथले केस स्वच्छ करणं महकत्त्वाचं आहे. पण प्रायव्हेट पार्टचे केस कसे काढायचे हे जाणून घेणंदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. चूक केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता.

उत्तर प्रदेशच्या जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजमधील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. युगल राजपूत यांनी न्यूज18 ला सांगितलं की, खाजगी भागाचे केस कधी आणि किती दिवसांनी स्वच्छ करायचे हे लोकांच्या निवडीवर अवलंबून असतं.

जर तुम्हाला केसांची समस्या असेल तर तुम्ही महिन्यातून एकदा खाजगी भागाचे केस काढू शकता किंवा ट्रिम करू शकता. आठवड्यातून किंवा काही दिवसांतून अनेक वेळा गुप्तांगाचे केस काढणं आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.

यामुळे त्वचेवर जळजळ, कट आणि संसर्ग होऊ शकतो. तुमच्या शरीराच्या गरजेनुसार ते कधी स्वच्छ करायचे ते ठरवा. डॉक्टरांच्या मते, प्रायव्हेट पार्टवरील केस काढण्यासाठी वॅक्सिंग, शेव्हिंग आणि हेअर रिमूव्हल क्रीमसारखे पर्याय आहेत.

शेव्हिंगबद्दल बोलायचे झाले तर, ही एक सुरक्षित पद्धत आहे. तुम्ही घरी सहजपणे दाढी करू शकता. हेअर रिमूव्हल क्रीम ही वेदनारहित पद्धत आहे, परंतु त्यात रसायने असतात, ज्यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)