जमिनीवर बसून जेवल्याने काय होते?

पचन सुधारते: मांडी घालून बसल्याने पोटावर हलका दाब येतो, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.

रक्ताभिसरण सुधारते: शरीराच्या खालच्या भागातील रक्ताभिसरण वाढते, जे हृदयासाठी चांगले आहे.

शरीराची लवचिकता वाढते: मांडी घालण्याची सवय सांधे आणि स्नायूंना अधिक लवचिक बनवते.

शांतता आणि एकाग्रता वाढते: जमिनीवर बसल्याने मन शांत होते आणि जेवणावर अधिक लक्ष केंद्रित होते.

जेवण जास्त वेळ टिकते: हळू आणि शांतपणे जेवण केल्याने पोट भरल्याचे संकेत लवकर मिळतात.

वजन नियंत्रणात मदत: हळू जेवल्यामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त खाणे टाळले जाते.

कुटुंबासोबतचे संबंध सुधारतात: एकत्र जमिनीवर बसून जेवण केल्याने सामाजिक बांधणी मजबूत होते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)