गहिणींनो सावधान! कांद्यावरील काळी बुरशी धुवून वापरणं म्हणजे धोक्याची घंटा
कांदा कापताना त्याची साल काढल्यानंतर कांद्यावर एक काळ्या रंगाचा थर दिसतो.
तसे पाहाता बोटाने चोळल्याने तो काळा रंग निघतो. ज्यामुळे बहुतांश गृहिणी असा कांदा धूवून वापरतात.
पण तुम्हाला माहितीय का काांद्यावर काळापणा का येतो? किंवा ते नक्की काय आहे?
कांदा आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे. शिवाय कांदा टाकल्याशिवाय कोणत्याही पदार्थाला चव येत नाही, त्यामुळे तो प्रत्येक स्वयंपाक घरात खूप महत्वाचा आहे.
पण आज आम्ही याच कांद्याबद्दल एक अशी गोष्ट सांगणार आहोत, ज्याबद्दल ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल.
कांद्यवरील काळ्या रंगाला आपण बुरशी मानतो आणि त्याला धूवून पुन्हा वापतो. पण ही बुरशी आरोग्यासाठी हानिकारक आहे.
कांद्यामध्ये आढळणारी ही काळी बुरशी खरं तर Aspergillus niger आहे.
या प्रकारची बुरशी जमिनीत आढळते. ही काळी बुरशी आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. या प्रकारच्या बुरशीमुळे माणसाला एलर्जी होते. ज्यांना ऍलर्जी आहे त्यांनी या प्रकारचा कांदा कधीही खाऊ नये.
या प्रकारचा कांदा दमा असलेल्या लोकांसाठी देखील हानिकारक असू शकतो. त्यामुळे अशा लोकांनी कांदा धूवून नाही तर त्याचा एक किंवा दोन थर काढून खाणे चांगले.