आजच्या वेगवान जीवनशैलीत कॉफी हे एक अत्यंत लोकप्रिय पेय बनले आहे. अनेकांना सकाळी उठल्या उठल्या कॉफीचा एक कप घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवात केल्यासारखे वाटत नाही.
पण, आरोग्य तज्ञांच्या मते, कॉफी पिण्याची एक योग्य वेळ असते आणि चुकीच्या वेळी ती प्यायल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.
सकाळी उठल्यावर लगेच कॉफी पिणे योग्य नाही. कारण, सकाळी 8 ते 9 या वेळेत शरीरात कोर्टिसोल नावाचे हार्मोन नैसर्गिकरित्या जास्त प्रमाणात तयार होते, जे तुम्हाला जागे आणि सतर्क ठेवण्यास मदत करते.
या वेळेत कॉफी प्यायल्यास कोर्टिसोलचे उत्पादन कमी होऊ शकते. त्यामुळे सकाळी 9:30 ते 11:30 ही कॉफी पिण्याची सर्वोत्तम वेळ आहे.
जेवणानंतर लगेच कॉफी प्यायल्यास शरीराला अन्नातील लोह आणि कॅल्शियम शोषून घेणे कठीण होते. त्यामुळे, जेवणानंतर कमीत कमी एक तास थांबून मगच कॉफी प्या.
झोपण्यापूर्वी 4 ते 6 तास आधी कॉफी पिणे टाळावे. कॉफीतील कॅफिन शरीरात जास्त वेळ राहते, ज्यामुळे झोप येण्यास अडथळा येतो.
रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्यास पोटातील ॲसिडचे प्रमाण वाढते. यामुळे छातीत जळजळ आणि पोटाला त्रास होऊ शकतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)