कुत्रा हा माणसाचा सर्वात विश्वासू मित्र, पण जर तोच अचानक रस्त्यावर आक्रमक झाला, तर?
रात्रीच्या वेळी अनेकदा कुत्रे हल्ला केल्याच्या अनेक गोष्टी घडल्या आहेत. पण अशात काही टिप्स लक्षात ठेवलात तुमचा जीव वाचवू शकतो.
कुत्रा समोर आला की बरेचजण घाबरून धावतात, पण हेच चुकीचं वागणं आहे. थांबा, स्थिर उभे राहा आणि थेट त्याच्या डोळ्यात बघू नका.
कुत्रा मागे लागला तरी पळू नका. शांतपणे काही पावलं मागे घ्या किंवा थांबा. यामुळे त्याला वाटतं की तुम्ही धोका नाहीत.
बाईकवर असाल तर काय कराल? जर कुत्रा बाईकच्या मागे लागला असेल त शक्य असेल तर वेग वाढवा आणि निघून जा. नसेल तर थांबा. घाबरून चुकीची हालचाल करू नका.
कधी-कधी अनेक कुत्रे एकत्र येतात. अशा वेळी आरडाओरड किंवा धावपळ करू नका. स्थिर उभे राहा आणि शांत रहा
स्वतःचा बचाव कसा कराल? कुत्रा जवळ आला, तर छत्री, बॅग किंवा काठी वापरा. हवेत हालचाल करा तो मागे सरकतो. हातात खायचा पदार्थ असेल तर त्याच्या दिशेने फेकून विचलित करा.
हल्ला झाला तर काय कराल? सर्वात आधी चेहरा आणि डोळे वाचवा. शक्य तितक्या शांतपणे स्वतःचं रक्षण करा. पुढे त्वरित वैद्यकीय मदत घ्या.
कुत्र्यांवर राग काढू नका ते फक्त आपली हद्द सांभाळतात. शांत आणि सजग राहिलात, तर धोका टाळता येतो.