सकाळी उठल्यावर गरम चहा किंवा कॉफीचा कप पिण्याची सवय अनेकांना असते. पण, रिकाम्या पोटी चहा-कॉफी पिणे आरोग्यासाठी योग्य आहे का, हा प्रश्न नेहमीच पडतो. आरोग्य तज्ञांच्या मते, तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होते, यावरच तुमच्या पूर्ण दिवसाचे आरोग्य अवलंबून असते.
सकाळी पाणी प्यावे रात्रभर झोपल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे, सकाळी उठल्यावर लगेच 1-2 ग्लास कोमट पाणी पिणे सर्वोत्तम असते. पाणी पोटातील ॲसिड संतुलित करते, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढते आणि चयापचय सुरू करते.
पाण्याचे फायदे रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होतात आणि त्वचेवर चमक येते. पाणी शरीरासाठी नैसर्गिक डिटॉक्स म्हणून काम करते.
चहा पिण्याचे तोटे सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पोटातील ॲसिडचे प्रमाण वाढते, ज्यामुळे ॲसिडिटी, छातीत जळजळ आणि पोट फुगणे यांसारख्या समस्या होऊ शकतात. चहामधील टॅनिन पोषक तत्वे शोषून घेण्यास अडथळा निर्माण करते.
कॉफी पिण्याचे तोटे चहापेक्षा कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण अधिक असते. रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्यास ॲसिडिटीची समस्या आणखी वाढू शकते. यामुळे पोटात वेदना, मळमळ किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
चहा आणि कॉफी कधी प्यावी चहा किंवा कॉफी पिणे टाळणे शक्य नसल्यास, काहीतरी खाल्ल्यानंतरच प्या. यामुळे पोटातील ॲसिडची पातळी नियंत्रणात राहते आणि त्याचे दुष्परिणाम कमी होतात.
सर्वात योग्य पर्याय थोडक्यात, सकाळी उठल्यावर तुमच्या शरीराला सर्वात जास्त गरज पाण्याची असते. त्यामुळे, कोणताही विचार न करता पाणी हाच सर्वात चांगला पर्याय आहे. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट होते आणि तुम्ही दिवसभर उत्साही राहता. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)