अंडरगार्मेंटस कधी बदलायचे?
कपड्यांना एक्स्पायरी डेट नसते,
त्यामुळे ते कधी बदलायचे
याचं टेन्शन नसतं.
म्हणजे किती तरी लोक आहेत
जे कपडे फाटेपर्यंत,
खराब होईपर्यंत वापरतात.
विशेषत: अंडरगार्मेंट्स
जे आपल्या शरीरावरील कपड्यांच्या
आत असतात.
दिसत तर नाहीत मग चालतंय,
असं म्हणत त्याच वापरत राहतात.
पण तुम्हाला माहिती आहे,
अंडरगार्मेंटस बदलण्याचीही
एक वेळ असते.
तुम्ही ज्या बजेटप्रमाणे
इनरवेअर घेतलं आहे,
त्यानुसार ते बदला.
म्हणजे खूप बेसिक किमतीत
इनरवेअर घेतलं असेल
तर ते 3-4 महिन्यांनी बदला.
वुमन अवेरनेस प्रोगाम इन लेडीज अंडरगार्मेंट ही मोहीम राबवणाऱ्या
सोनल गांधी यांनी
एका पॉडकास्टमध्ये
ही माहिती दिली आहे.