गरोदरपणा हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील एक महत्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. पण काही वेळा अचानक पोटात असह्य वेदना होतात ज्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये गुंतागुंत वाढू शकते.
तीव्र किंवा अचानक वेदना: पोटात असह्य आणि अचानक सुरू होणारी तीव्र वेदना धोकादायक असू शकते.
योनीतून रक्तस्त्राव: वेदनेसह रक्तस्त्राव झाल्यास त्वरित डॉक्टरांना संपर्क साधावा.
सतत उलट्या किंवा ताप: पोटदुखीसोबत वारंवार उलटी होणे किंवा जास्त ताप येणे हे चिंतेचे कारण आहे.
प्रेशर किंवा क्रॅम्प सोबत योनीतून पाणी जाणे: गर्भाशयाच्या पिशवीतील पाणी फुटल्याचे लक्षण असू शकते.
24 तासांहून अधिक काळ टिकणारी वेदना: जर वेदना एका दिवसापेक्षा जास्त काळ थांबत नसेल, तर तपासणी आवश्यक आहे.
बाळाची हालचाल कमी होणे: पोटदुखीच्या वेळी बाळाची हालचाल जाणवत नसेल, तर त्वरित वैद्यकीय मदत घ्या. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)