कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे पायांना सूज येते?

पायांना सूज येणे ही एक सामान्य समस्या आहे, जी अनेक कारणांमुळे होऊ शकते. यामध्ये सतत उभे राहणे किंवा जास्त वेळ बसून राहणे यांचा समावेश असतो. पण, काही वेळा ही सूज शरीरातील गंभीर समस्येचा संकेत असू शकते. आरोग्य तज्ञांच्या मते, एका विशिष्ट व्हिटॅमिनच्या गंभीर कमतरतेमुळे पायांना सूज येऊ शकते, ज्याला वैद्यकीय भाषेत ‘बेरीबेरी’ रोग म्हणतात.

व्हिटॅमिन बी 1 हे शरीराच्या चयापचय क्रियेसाठी आवश्यक असते. या व्हिटॅमिनच्या गंभीर कमतरतेमुळे ‘वेट बेरीबेरी’ नावाचा आजार होतो, ज्यात हृदयाचे कार्य बिघडते आणि शरीरात, विशेषतः पायांमध्ये पाणी जमा होऊ लागते.

व्हिटॅमिन बी 1 च्या कमतरतेमुळे हृदयाला पुरेसे रक्त पंप करता येत नाही, ज्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्यांवर दबाव वाढतो आणि पायांमध्ये पाणी साठून राहते.

व्हिटॅमिन बी 1 च्या कमतरतेमुळे पायांना सूज येण्यासोबतच इतरही लक्षणे दिसतात. जसे की, खूप जास्त थकवा जाणवणे, श्वास घेण्यास त्रास होणे, हृदयाचे ठोके वाढणे, आणि भूक कमी होणे.

व्हिटॅमिन बी 1 ची कमतरता सहसा कुपोषणामुळे किंवा रोजच्या आहारात पौष्टिक पदार्थांचा अभाव असल्यामुळे होते. तसेच, जास्त प्रमाणात दारू पिणाऱ्या लोकांमध्येही हे व्हिटॅमिन कमी होते.

पायांना सूज येणे हे केवळ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळेच होते असे नाही. हे किडनीचे आजार, हृदयाचे आजार, यकृताचे आजार किंवा गर्भधारणेचे लक्षण देखील असू शकते.

जर तुमच्या पायांना सूज वारंवार येत असेल, ती कमी होत नसेल किंवा त्यासोबत श्वास घेण्यास त्रास, छातीत दुखणे अशी लक्षणे असतील, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)