दही लावताना ‘हे’ भांडं वापरताय? तुमचं आरोग्य धोक्यात आहे

दही शरीराला थंड ठेवतं, पचन सुधारतं आणि उष्णतेचा त्रास कमी करतं. 

अनेकजण रोजच्या जेवणात दही, ताक किंवा लस्सीचा समावेश करतात.

बहुतेक घरांमध्ये दही घरीच लावलं जातं. पण ते कोणत्या भांड्यात लावलं जातं, याबद्दल अनेकांना माहिती नाही.

खरंतर चुकीच्या भांड्यात दही लावण्याचे धोकादायक आजार उद्भवू शकतात. शिवाय दही आरोग्यासाठी चांगलं तर सोडा त्याचं विष बनेल.

तांब्याचं भांडं (Copper), पितळ्याचं भांडं (Brass) ही भांडी अ‍ॅसिडिक दहीशी रासायनिक प्रतिक्रिया देतात. त्यामुळे ते टाळावं.

दह्यात लॅक्टिक अ‍ॅसिड असतं. हे अ‍ॅसिड तांबा आणि पितळ यांच्याशी प्रतिक्रिया करतं आणि बनतात विषारी संयुगे जसं की कॉपर सल्फेट

मग दही कोणत्या भांड्यात लावावे?

तर मातीचं भांडं, काचेचं भांडं, सिरेमिक / चीनीमातीचं भांडं,️ स्टीलचं भांडं. 

ही भांडी दही लावण्यासाठी सुरक्षित आहेत आणि आरोग्यदायीही.

दही आहे आरोग्याचं रक्षण करणारा पदार्थ, पण चुकीच्या भांड्यात लावलंत तर तेच आरोग्याचा शत्रू ठरू शकतं.