दारू प्यायल्यानंतर जास्त भूक का लागते?

तुमच्यासोबत कधी असं झालंय? की दारू प्यायल्यानंतर अचानक वाटतं की पोटात उंदीर धावतोय?

हे तुमच्याच बाबतीत नाही, सगळ्यांसोबत होतं

खरंतर दारू पिल्यावर आपल्या मेंदूतला एक भाग, म्हणजे हायपोथॅलेमस एकदम जागा होतो.

हा भाग भूक आणि क्रेविंगचं नियंत्रण करतो.

दारू पोटात गेल्यावर हा भाग म्हणतो, “अरे, अजून खा… तूला खूप भूक लागली आहे, काही तरी चमचमीत खा”

शिवाय दारूमुळे ब्लड शुगर लेव्हल कमी होते. शरीराला ऊर्जा हवी असते आणि त्यासाठी आपण जास्त खाणं पसंत करतो.

दारू घेतली की आपली कंट्रोलची ताकद पण कमी होते. मग भूक लागली की जंक फूड, तळलेलं, बर्गर-पिझ्झा काहीही चालतं.

हे खाऊन वजन वाढतं, अपचन होतं, आणि पोटावर परिणाम होतो.

त्यामुळे दारू प्यायल्यावर भूक लागणं नैसर्गिक आहे, पण योग्य आणि हेल्दी पर्याय निवडणं गरजेचं आहे.