हिवाळ्यात खजूर का खावेत? जाणून घ्या कारणं

खजूरामध्ये फायबर, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, तांबे, लोह, व्हिटॅमिन बी६ सारखे अनेक पोषक घटक आढळतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

हिवाळ्याच्या काळात खजूर रोज खाल्ल्यास ते आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते.

जयपूरच्या न्यूट्रिशनिस्ट डॉ. मेधवी गौतम यांनी सांगितले की, खजूर खाण्याचे अनेक फायदे आहेत, याचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते.

खजूर हिवाळ्यात खोकला आणि सर्दीपासून बचाव करण्यास मदत करतात, तसेच ते तुमचे शरीर उबदार ठेवण्यास मदत करते. 

हिवाळ्यात रात्री गरम दुधात उकडलेल्या खजुराचे सेवन करणे अधिक फायदेशीर ठरेल. तुम्ही दिवसातून २ ते ३ खजूर खाऊ शकता. 

खजुरामध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते आणि ती नैसर्गिक साखर असते. त्यामुळे खजुराच्या दुधात आणखी काही घालण्याची गरज नसते. खजूर हे नैसर्गिक साखरेचे स्रोत आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी त्याचे सेवन टाळावे.