जांभूळ शेतीतून शेतकरी झाला लखपती!

शेतकरी पारंपारिक पिकांना फाटा देत नवनवीन प्रयोग आपल्या शेतात करत आहेत.

जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यानंही असाच एक प्रयोग  केलाय.

अंबड तालुक्यातील आमलगावच्या शेतकऱ्यानं दोन एकर जांभूळ शेतीमधून सात लाख रुपये उत्पन्न मिळवलंय.

प्रल्हाद येलेकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे. त्यांनी 2014 साली 300 जांभूळ झाडांची लागवड आपल्या दोन एकर शेतात केली.

यासाठी त्यांनी पालघर येथून बहडोली जातीची रोपे विकत आणली. रोप खरेदीसाठी त्यांना 1 लाख रुपये खर्च आला.

येलेकर यांच्या शेतामध्ये 2021 पासून जांभळाचे उत्पन्न सुरू झाले.

पहिल्या वर्षी 1 ते दीड लाख रुपये यातून त्यांना मिळाले. दुसऱ्या वर्षी 2.5 लाखांचे उत्पन्न त्यांनी जांभूळ शेतीमधून घेतलय.

या वर्षी जांभळाचं चांगलं उत्पन्न झालंय. आम्ही आतापर्यंत दोन टन जांभळाची विक्री केली आहे. 

तर आणखी चार टन माल झाडावर आहे.

सध्या यातून दोन लाख रुपये झाले असून आणखी पाच लाख रुपये जमा होतील अशी आपली अपेक्षा असल्याचं येळेकर यांनी सांगितले.