कागदाच्या लगद्यापासून आकर्षक गणपती मूर्ती!

आपल्या लाडक्या गणेश बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.

आजपर्यंत तुम्ही पीओपीचे, शेतमातीचे आणि शाडूच्या मातीचे गणपती पाहिल्या असतील.

त्याचबरोबर कागदाच्या लगद्यापासून सुंदर अशा गणेश मूर्ती देखील आता मिळत आहेत.

पुण्यातल्या बाजारपेठेत या मूर्ती दाखल झाल्या आहेत. या मूर्तींना सध्या चांगली मागणी आहे.

हातकागद संस्था खादी ग्रामोद्योग पुणे यांनी कागदाच्या लगद्यापासून गणेश मूर्ती तयार केले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून कागदापासून बनवलेल्या या मूर्ती विशेष आकर्षण ठरत आहेत.

यामध्ये 80 ते 90 टक्के कागद आणि 10 ते 20 टक्के शाडू असं प्रमाण असतं.

दोन ते तीन तासांमध्ये कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या गणपती मूर्तींचे विघटन होते.

बाप्पाला घरी आणताना घ्या 4 गोष्टींची काळजी

Learn more