महाराष्ट्राच्या सृष्टीनं जग जिंकलं
महाराष्ट्राच्या सृष्टीनं जग जिंकलं
भारतातील अनेक दिग्गज खेळाडू आपल्या कौशल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव उंचावत असतात.
नागपूरची जागतिक दर्जाची लिंबो स्केटर सृष्टी शर्मा हिनं आणखी एक पराक्रम केलाय.
प्रतिष्ठेच्या ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये तिचे आठव्यांदा नाव दाखल झाले आहे.
लिंबो स्केटिंगमध्ये आठ वेळा विश्वविक्रम करणारी सृष्टी ही जगातील पहिली महिला स्केटर ठरलीय.
वयाच्या 18 व्या वर्षी तिने 50 मीटरपेक्षा वेगवान लिंबो स्केटरचा विक्रम आपल्या नावावर केलाय.
सृष्टी शर्मा हिने पूर्वी ‘फास्टेस्ट टाईम टू लिम्बो स्केट ओव्हर 50 मीटर’ या प्रकारात विश्वविक्रम केला होता.
आता परत सृष्टीने स्वत:चाच विक्रम मोडीत काढत 6.94 सेकंदाचा नवा विक्रम प्रस्थापित केलाय.
सृष्टीनं आपली मोठी बहिण सिद्धीकडे बघत स्केटिंग सुरू केलं आणि मागं वळून पाहिलंच नाही.
आज ती देशातली पहिली आइस लिंबो स्केटर ठरली असून 8 जागतिक विक्रम तिच्या नावे आहेत.
खेळाप्रमाणेच सृष्टीने अभ्यासात देखील प्राविण्य मिळवले असून 12 वीत 86 टक्के गुण मिळवलेत.
दुसऱ्याच वर्षी केला वर्ल्ड रेकॉर्ड
Learn more