नोकरी सोडूनही MBA तरुण झाला लखपती
नोकरी सोडूनही MBA तरुण झाला लखपती
शेती आणि शेतकऱ्यांपुढे अनेक आव्हाने असताना देखील या क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग होत आहेत.
जालना जिल्ह्यातील हसनाबादचे शेतकरी मनोज लाठी हे असेच प्रयोगशील शेतकरी आहेत.
ठेकेदार असणाऱ्या लाठी यांनी वीट भट्टीसह विविध व्यवसाय केले मात्र हवं ते यश मिळालं नाही.
2017 पासून आपल्या 16 एकर वडिलोपार्जित जमिनीत त्यांनी वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली.
विशेष म्हणजे त्यांच्या MBA झालेला मुलगा प्रफुल्ल याने चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेतीचा निर्णय घेतला.
YouTube वर पाहून प्रफुल्लने छत्तीसगढ येथील रायपूर येथून 1 हजार पेरूची रोपे आणून लागवड केली.
लागवडीनंतर 3 वर्षे पेरूची बाग तोट्यात होती मात्र आंतरपिकातून नुकसान भरून काढलं.
यंदा पेरूच्या बागेला खत, पाणी देत चांगलं व्यवस्थापन केल्याने 25 टनांचं उत्पन्न हाती आलं.
23 क्विंटलची एक गाडी सुरतला पाठवली असून तिला 48 रुपये प्रतिकीलो एवढं दर मिळाला.
यंदा पेरूच्या शेतीतून आम्हाला 10 लाख रुपये उत्पन्न होईल असं मनोज लाठी यांनी सांगितलं.