दीड वर्षांचा चाणक्य

दीड वर्षांचा चाणक्य

सर्वच लहान मुलांमध्ये नवनवीन गोष्टींबाबत कमालीची उत्सुकता आणि जिज्ञासा असते.

कोल्हापुरातील दीड वर्षांचा चाणक्य त्याच्या आकलन क्षमतेमुळं सध्या चर्चेचा विषय ठरतोय. 

आपल्या बौद्धिक क्षमतेच्या जोरावर अर्शित शिंदे बालक जिनियस कीड ठरला आहे. 

अर्शित हा अत्यंत हुशार असून लहान वयातच विविध गोष्टी कार्ड्सच्या माध्यमातून ओळखतो. 

जागतिक विक्रमात आर्शितने शरीराचे 14 अवयव, सूर्यमाला, 18 फळे, 36 प्राणी-पक्षी ओळखळे.

तसेच 15 महान व्यक्तिमत्त्वे, इंग्रजी अक्षरे, 9 प्राणीपक्षांचे आवाज आणि त्यांची कृतीही ओळखळी.

16 प्राणी पक्षाच्या सावल्या, 16 आशियाई आणि युरोपियन देशाचे ध्वज, 41 विविध वस्तू ओळखल्या.

तसेच 16 भाज्या, 9 भावना, 7 रंग आणि आकार, 4 ऋतू, 18 वाहने, 11 मदतनीस सांगितले.

4 वाहतूकीचे मार्ग, 6 व्यायाम आणि योगासने प्रकार ओळखत अर्शितने विश्वविक्रम केला. 

या विक्रमवीराची चेन्नईच्या ‘कलाम्स वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये जिनियस कीड म्हणून नोंद झाली आहे.