भाद्रपदाच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला साजरा केला जातो गणेशोत्सव.
या दिवसांत बाप्पाच्या मूर्तीची अत्यंत विधिवत स्थापना करून केली जाते पूजा.
यंदा गणेश चतुर्थीला 18 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12 वाजून 39 मिनिटांनी होईल सुरुवात.
तर, 19 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 01 वाजून 43 मिनिटांनी चतुर्थी होईल समाप्त.
लक्षात असूद्या, बाप्पाच्या डाव्या सोंडेच्या मूर्तीची करावी स्थापना.
बाप्पाच्या हातात असावं मोदक, सोबतीला असावा वाहक उंदीर.
मूर्तीचा रंग लाल असल्यास घरात येते सुख, समृद्धी. पांढऱ्या रंगाच्या मूर्तीमुळे शांतता होते प्रस्थापित.
बाप्पाचं तोंड असावं उत्तर दिशेला. या दिशेत असतो लक्ष्मी आणि महादेवांचा वास, अशी आहे मान्यता.
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.