गणेशोत्सव काळात घरोघरी अत्यंत प्रसन्न वातावरणात होतो बाप्पाचा पाहुणचार.
भाविक बाप्पाला त्याच्या आवडीच्या पदार्थांचं दाखवतात नैवेद्य.
गणेश पूजनाच्या आरतीच्या ताटात काही विशिष्ट वस्तू असणं आवश्यक.
दुर्वा : बाप्पाला आहे विशेष प्रिय. आरतीच्या ताटात ठेवाव्या दुर्व्याच्या 3 ते 5 जोड्या. असं केल्यास घरात धनसंपत्तीचा होतो वर्षाव.
मोदक : हा आहे बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी मोदकाचा नैवेद्य दाखवणं मानलं जातं शुभ.
लाडू : बाप्पाला मोतीचूरचे लाडूदेखील असतात विशेष प्रिय. आरतीच्या ताटात समावेश केल्यास भाविकांची प्रत्येक इच्छा होते पूर्ण.
हळद : बाप्पाला हळद आवर्जून करावी अर्पण. यामुळे गणेश पूजा मानली जाते परिपूर्ण. घराची होते भरभराट, नांदतं आनंदाचं वातावरण.
कुंकू : बाप्पाने लहानपणी केला होता ‘सिंदूर’ राक्षसाचा वध. शरीरावर सर्वत्र लावलं होतं त्याचं रक्त. त्यामुळे बाप्पाला कुंकू करावं अर्पण. ते असतं मांगल्याचं प्रतीक.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)