राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अयोध्या सज्ज!
बहुप्रतीक्षित राम मंदिराचं बांधकाम युद्धपातळीवर आहे सुरू.
जानेवारीत मंदिराचा पहिला टप्पा होणार पूर्ण, भगवान श्रीराम भव्य मंदिरात होणार विराजमान.
राम मंदिराच्या बांधकामापासून अयोध्येत विकासकामांना आला वेग.
आंतरराष्ट्रीय विमानतळाचं बांधकाम जवळपास पूर्ण, अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचं कामही आहे सुरू.
राम मंदिराकडे जाणाऱ्या राम पथ, भक्ती पथ, जन्मभूमी पथाचं काम झालंय पूर्ण. आकर्षक दिव्यांनी सजले आहेत तीनही रस्ते.
राम जन्मभूमी परिसरात प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत मूलभूत सुविधा.
शरयू नदीत सौरऊर्जेवर वातानुकूलित जहाज आणि मोटार बोट चालवण्याची तयारीही आहे सुरू.
शरयूकिनारी संग्रहालय, रामायणकालीन वन, सूर्य तलाव, समदा झरा, मणी पर्वत आणि प्राचीन पूल सजवले जाणार.
अयोध्येला धार्मिक महत्त्व आहेच, आता सोयी-सुविधा आणि सजावटीमुळे हे एक उत्तम पर्यटक क्षेत्रदेखील होणार.