हिरव्या बांगड्या नेमक्या का घालाव्या?

बांगड्या म्हणजे सोळा शृंगारातील एक महत्त्वाचा दागिना.

हातात भरपूर हिरव्या बांगड्या आणि त्यांचा आवाज कोणाला नाही आवडत…

मात्र सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात एवढ्या बांगड्या सांभाळाव्या तरी कशा, हादेखील मोठा प्रश्नच.

सौभाग्यवतीने हातात बांगड्या घालण्याची परंपरा आहे वेदिक काळापासून. म्हणूनच देवीच्या हातातही असतात हिरव्या बांगड्या.

बांगड्यांमुळे स्त्रीच्या नवऱ्याचं आयुष्य वाढतं, असं ज्योतिषशास्त्र सांगतं.

बांगड्यांच्या आवाजाने घरात सकारात्मकता येते, असं म्हटलं जातं.

काय सांगता… बांगड्यांमागे आहे शास्त्रीय कारण?

करंगळीच्या खालच्या बाजूस सहा इंचांवर असतात ऍक्यूप्रेशर पॉईंट. या पॉईंट्सवर दबाव पडल्यास आरोग्य सुदृढ राहतं, असं म्हटलं जातं.

परिणामी बांगड्यांमुळे स्त्रीचं आरोग्य सुदृढ राहतं, असं मानलं जातं.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)