चक्क कॅफेत मिळत आहे पुरणपोळी आणि मोदक

पुण्याचा गणेशोत्सव, पर्यटन स्थळ, पुण्यातील पुणेरी पाट्या जगप्रसिद्ध आहेत. तशीच पुण्यातील खाद्य संस्कृती ही जगात नावाजली जाते.

पुणेकर खवय्ये असल्याने त्यांच्या आवडीचे पदार्थ ही त्याच पद्धतीचे असतात.

पण तुम्ही कधी ऐकलं का कॅफेमध्ये मिळणारी पुरणपोळी आणि मोदक नाही ना? पण पुण्यातील एका कॅफेमध्ये हे पदार्थ मिळत आहेत.

पुण्यातील सदाशिव पेठेत राहणाऱ्या विशाल खोपकर तरुणाने कॅफे 30 सुरु केला आहे.

यामध्ये चक्क पिझ्झा, बर्गर ते पुरणपोळी, मोदक अशी मेजवानी त्याने खवय्यांना चखायला दिली आहे.

या कॅफेमध्ये गेल्या वर तुम्हाला पुण्याच्या संस्कृतीचे दर्शन घडते. तसेच पुणेरी पाट्या पेठेतील संस्कृती पहिला मिळते.

महाराष्ट्र ते इटालियन असे पदार्थ मेनू कार्डमध्ये पाहायला मिळतात. तसेच लोकांना इंगेज करण्यासाठी काही गेम देखील ठेवलेले आहेत.

कुठे आहे हा कॅफे? कर्वे रोड करिश्मा अपार्टमेंटच्या पुढे कॉर्नरला व्हेज किमया रेस्टॉरंटच्या शेजारी कॅफे 30 पहिला मिळेल.