श्रावण महिन्यात का करतात उपवास?
श्रावण महिन्यात का करतात उपवास?
श्रावण महिना हा हिंदू धर्मात पवित्र मानला जातो आणि या काळात व्रत वैकल्यांना विशेष महत्त्व असते.
श्रावण मासात अनेक महिला आणि पुरुष श्रावणी सोमवारसह विविध उपवास करत असतात.
या महिन्यात केलेल्या उपवासाचे काय फळ मिळते याबाबत जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते.
जालना शहरातील प्रसिद्ध ज्योतिषी डॉ. राजेश महाराज सामनगावकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
अखंड सौभाग्य प्राप्त राहण्यासाठी सोमवारचे व्रत करणे अतिशय उत्तम सांगितले आहे.
श्रावण महिन्यात शिव पार्वती संपूर्ण गणांसहित पृथ्वी लोकावर वास करतात असं सांगितलं जातं.
श्रावण महिन्यात महादेवाची पूजा आणि उपवास हे अनंत पुण्य फळ प्राप्त करून देणारे आहे.
या महिन्यात तांदूळ, तीळ, जवस आणि जव यांची शिवामूठ महादेवाला प्रत्येक सोमवारी वाहतात.
महादेवाच्या पूजनात बेल पत्राचे विशेष महत्त्व असून अभिषेकालाही मोठे महत्त्व आहे.
शिवलीला अमृत पारायण केल्यानेही भगवान शंकर प्रसन्न होतो, असे सामनगावकर सांगतात.
कागदाच्या लगद्यापाूसून आकर्षक गणेशमूर्ती
Learn more