ही शेती कराल तर चारचाकीत फिराल
ही शेती कराल तर चारचाकीत फिराल
आज-काल बहुतांश शेतकरी पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीकडे वाटचाल करत आहेत.
अल्पभूधारक शेतकरी कमी काळात आणि कमी क्षेत्रात भरघोस उत्पन्न देणाऱ्या पिकाच्या शोधात असतात.
अगदी दहा बाय दहाच्या जागेत हजारोंचं उत्पन्न देणारी शेती म्हणून मशरुमची ओळख आहे.
बीडमधील कृषी अभ्यासक रामेश्वर चांडक यांनी याच पिकाबाबत माहिती दिली आहे.
छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मशरूमची शेती फायदेशीर होऊ शकते.
मशरूम शेती करताना शेती, पाणी आणि खतांचे योग्य व्यवस्थापन करण्याची गरज असते.
मशरूम शेतीसाठी जास्त जमीन किंवा पैशांची गरज नसते तर ती दहा बाय दहाच्या जागेतही करता येते.
दहा बाय दहाच्या जागेत 500 रुपयांचं बियाणं आणि हजार रुपयांच्या प्लास्टिक पिशव्यांची गरज असते.
तेवढ्याच जागेत 30 ते 45 दिवसांत महिन्याकाठी 50 हजारांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.
राज्य सरकार मशरूम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदानही देते, असे चांडक सांगतात.